Nana Patole:  Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole: 'काहीतरी वेगळं शिजतंय' ; 'इंडिया VS भारत' वादादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य

Nana Patole: ' 'इंडिया VS भारत' वादादरम्यान काँग्रेस प्रदेश नाना पटोले यांनी 'काहीतरी वेगळं शिजतंय', असं मोठं विधान केलं आहे

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Nana Patole News In Marathi :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 'जी-२०' साठी राष्ट्राध्यक्ष आणि मंत्र्यांना डिनरच्या निमंत्रण पत्रिकेत 'प्रेसिडेंट ऑफ भारत' लिहिल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 'इंडिया VS भारत' या वादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. 'इंडिया VS भारत' वादादरम्यान काँग्रेस प्रदेश नाना पटोले यांनी 'काहीतरी वेगळं शिजतंय', असं मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

'इंडिया VS भारत' वादावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निमंत्रण पत्रिकेत 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केल्याने या पुढच्या काळात विशेष अधिवेशनात काहीतरी वेगळं शिजणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

'भाजपने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा नव्या संसदेच्या उद्घाटन प्रसंगापासूनच 'अवनत' केल्याची टीका पटोले यांनी केली. हुकूमशाही चालली असताना लोकांना वस्तुस्थिती सांगण्यासाठी काँग्रेसची जनसंवाद यात्रा आहे. मात्र इंडिया आघाडीला भाजप घाबरली आहे, असे बोलत इंडिया आणि भारत वेगळे नाही असा खुलासा पटोले यांनी केला.

इंडिया आघाडीचा धसका मोदींनी घेतला;विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील 'इंडिया विरुद्ध भारत' वादावर भाष्य केलं. 'राज्यात शेतकऱ्यांना फसवणारा सरकार अस्तित्वात आलं आहे. पीएम किसान सन्मान योजनचा लाभ मिळाला नाही. बेरोजगारी,महागाई कोणालाही न्याय मिळत नाही. राज्य कोण चालवत आहे? खरा मुख्यमंत्री कोण? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

'लोकांच्या वेदना आणि शेतकऱ्यांचा दुःख जाणून घेण्यासाठीही जनसंवाद यात्रा आहे. काँग्रेस म्हणून इंडिया म्हणून आम्ही लढू, इंडियाचा धसका मोदींनी घेतला आहे. खरा सर्व्हे आमच्याकडे आहे, असा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT