congress, sushilkumar shinde, presendital election saam tv
महाराष्ट्र

शरद पवारांनंतर राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यास संधी; दिल्लीत बैठक सुरु

आज (रविवार) राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारांच्या नावात वेगाने घडामाेडी घडू लागल्या.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (ncp) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक (president election) लढविण्यास नुकताच नकार दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यक्ती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नसेल असे निर्माण झालेल्या चित्रात पुन्हा काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांच्या नावाच्या चर्चेने रंग भरु लागले आहे. (sushilkumar shinde latest marathi news)

राष्ट्रपतीपदाची निवडणूक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लढविण्यास नकार दिला. त्यानंतर काही काळ महाराष्ट्रातील राजकारणात शांतता पसरली. या काळात पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी (gopalkrishna gandhi) आणि जम्मू-काश्मीर येथील माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला (farooq abdullah) यांची नावे चर्चेत आली.

या नेत्यांच्या नावांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. दरम्यानच्या काळात सर्वपक्षांशी काेणाचे उत्तम संबंध आहेत याची चाचपणी केल्यानंतर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde latest update) यांचे नाव काहींनी पुढे आणले.

त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून शिंदे यांना तातडीने दिल्लीला बाेलाविण्यात आले. शिंदे यांना पक्षश्रेष्ठींचा निरोप मिळताच त्यांनी थेट दिल्ली गाठले. सूत्रांच्या माहितीनूसार शिंदे यांची काॅंग्रेसच्या काही नेत्यांसह श्रेष्ठींशी बैठक सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT