congress leaders distributed sweets in sangli after farm law repealed today by narendra modi 
महाराष्ट्र

भाजप, काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू : रघुनाथदादा पाटील

कृषी कायदे रद्द करण्याची घाेषणा हाेताच सांगलीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

विजय पाटील

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा करताच सांगली (Sangli) आणि जत येथे काँग्रेस पक्षाने या निर्णयाचे जल्लाेषात स्वागत केले. देशातील शेतकरी आणि काँग्रेस आघाडीने केलेले आंदोलनाचा हा विजय असल्याचे मत काँग्रेसचे नेते महावीर पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ऐतिहासिक विजय असल्याने काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर वाटप केली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. congress leaders distributed sweets in sangli after farm law repealed today by narendra modi

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत Farm Laws To Be Repeal माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत विराेधी तसेच समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यात बहुतांश भागात फटाके फाेडून आनंद व्यक्त करण्यात आला. सांगलीत देखील काॅंग्रेस कार्यकर्ते आनंदित हाेते.

केवळ स्वार्थासाठी निर्णय : रघुनाथदादा पाटील

केवळ स्वार्थासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने कृषि कायदे रद्द केल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. भाजप आणि काँग्रेस हे एकाच नाण्याचे दोन बाजू असून काँग्रेसच्या सत्ताकाळात शेतकरी विरोधी कायद्यांमुळे २५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आता मोदी सरकारच्या धोरणामुळे ही शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू आहेत असा सनसनाटी आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.

मोदींनी जी कायदे केले होते ते चांगले होते. तर मग मागे का घेतले ? ते वाईट आहेत का ? असा प्रश्न रघुनाथदादांनी उपस्थित केला आहे. मोदी सरकारचे धोरण हे उद्योगपती धार्जिणी आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT