congress leader yashomati thakur appeals amravati citizens to be calm  Saam Digital
महाराष्ट्र

कट्टरपंथी वाद देशाला घातक, अमरावतीची शांतता अबाधित ठेवा : यशाेमती ठाकूर (पाहा व्हिडिओ)

congress leader yashomati thakur appeals amravati citizens to be calm : या प्रकरणी पोलिसांनी 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. यापैकी 7 युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती लाेकसभा मतदारसंघातून भाजप खासदार नवनीत राणा यांचा पराभव करणा-या विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयी रॅलीत अमरावतीच्या राजकमल चौकात काही युवकांनी अश्लील हातवारे व असभ्यतेचे वर्तन केले. युवकांचे हेे कृत्य नवनीत राणांबाबत असल्याचा ठपका युवकांवर असून या प्रकरणी पाेलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दरम्यान काॅंग्रेस आमदार यशाेमती ठाकूर यांनी या कृत्याचा निषेध नाेंदवित अमरावतीची शांतता भंग करण्याचा काेणीही प्रयत्न करु नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळणं येऊ नये यासाठी काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या प्रकाराचा निषेध केला. त्या म्हणाल्या याच समर्थन काेणीही करु नये आणि अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई हाेणे गरजेचे आहे.

दाेन समाजातील कट्टरपंथी हे केवळ अमरावतीला नव्हे तर देशाला घातक आहे. अमरावतीची शांती भंग होत असेल तर दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे. काही जण आजही राजकमल चाैकात दंगा भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत असा गंभीर आराेप करत अमरावतीत शांतता अबाधित राखून ठेवा असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

Padmadurg Fort : पावसाळ्यात पर्यटकांसाठी 'पद्मगड' ठरेल बेस्ट, तुम्ही कधी जाताय?

SCROLL FOR NEXT