Maharashtra Congress Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Congress: पटोले- थोरात वादानंतर कॉंग्रेस हायकमांड ऍक्शन मोडवर, बडा नेता घेणार थोरातांची भेट

दिल्लीतील हायकमांडकडून गंभीरपणे दखल घेतली गेली असून एक बडा नेता राज्यात दाखल झाला आहे

Rashmi Puranik

Mumbai: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघात सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. या वादानंतर कॉंग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या.

आता थेट काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून गंभीरपणे दखल घेतली गेली असून एक बडा नेता राज्यात दाखल झाला आहे. (Maharashtra Congress)

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) मुंबईत दाखल झाले आहेत. एच. के. पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरातांची भेट घेणार असून या भेटीत नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे.

थोरातांच्या भेटीनंतर पाटील पक्षातील नेत्यांबरोबर बैठक घेणार असल्याचं कळतंय. यापूर्वी राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांना तातडीनं दिल्लीत दाखल होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज पाटील मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यामधील वाद चांगलाच रंगला होता. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर थोरातांनी नाराजी दर्शवली होती, तसे पत्रही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिले होते, त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

SCROLL FOR NEXT