maharashtra CM Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Maratha-OBC : राज्याचे मुख्यमंत्री चतुर आणि चाणक्य; काँग्रेस नेता असं का म्हणाला?

Maratha-OBC Reservation Tussle : मराठा समाज आरक्षण जीआर आणि त्याला होणारा ओबीसींचा विरोध यावरून काँग्रेसनं थेट मुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हुशार, चतुर आणि चाणक्य आहेत, असं काँग्रेसनं म्हटलंय.

Nandkumar Joshi

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुशार आणि चाणक्य

  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

  • मराठा आरक्षण जीआरवरून उपरोधिक टीका

  • अजित पवारांवरही साधला निशाणा

विजय पाटील, सांगली | साम टीव्ही

मराठा समाज आरक्षण जीआर आणि ओबीसींचा त्या जीआरला होणारा विरोध यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री चतुर, हुशार आणि चाणक्य आहेत. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला फसवण्याचं काम निश्चितपणाने केलेले आहे, असा आरोप त्यांनी केला.

मराठा समाजाला आणि ओबीसीला काय दिलं हेच कळत नाही. एकाने म्हणायचं मारल्यासारखं कर आणि दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं आणि तिसऱ्यानं हसल्यासारखं करायचं, असं पद्धतशीर स्क्रिप्टेड काम राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. भविष्यात दोन्ही समाजाला ते कळेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ते सांगलीच्या कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ वर्षपूर्ती कार्यक्रमावेळी बोलत होते.

बाभळीच्या झाडाला दगड मारला की...

मराठा समाज आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआर (शासन निर्णय) वरूनही वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. मराठा समाजाच्या जीआरचा अर्थच कळत नाही. बाभळीच्या झाडाला दगड मारला की आंबे पडले म्हणून ओरडतात. आणि जवळ गेले की काटे रूततात. आता जवळ कोण-कोण जातं, त्याला ते काटे रुतणार आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवारांची अधिकारी महिलेला तंबी, वडेट्टीवारांचं टीकास्त्र

कोण अधिकारी प्रामाणिक काम करत असेल आणि त्याला अशा प्रकारे धमकावून काम करून घेत असतील तर यावरून दिसतंय की यांना सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा माज या प्रत्येकाला आला आहे. सत्ता म्हणजे मालक असं वाटू लागलं आहे. मालकी हक्काने सत्ता मिळाली असल्याचे वाटत आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT