Vijay Wadettiwar on PM Modi Saam tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar on PM Modi: लालकृष्ण अडवाणी कोणाच्या अहंकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत? काँग्रेस नेत्याचा PM मोदींना सवाल

'लालकृष्ण अडवाणी कोणाच्या अहंकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत? असा सवाल विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पीएम मोदी यांना केला आहे.

संजय डाफ

Vijay wadettiwar News: काँग्रेसच्या स्वार्थामुळे शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना काँग्रेस नेते, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. 'लालकृष्ण अडवाणी कोणाच्या अहंकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत? असा सवाल विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पीएम मोदी यांना केला आहे.

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना विजय वडेट्टीवार यांनी उत्तरे दिली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना वडेट्टीवर म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला संजय राऊत यांनी दिलं आहे . लालकृष्ण अडवाणी कोणाच्या अहंकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाही, कोणाचा अहंकार या देशाला अधोगतीकडे नेतो आहे. हे या देशातील सव्वाशे कोटी जनतेला ठाऊक आहे'.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, 'विकासाच्या फार मोठ्या कल्पना करणाऱ्या मोदी व भाजपच्या सरकारने दहा वर्ष झाली, आता किती वर्ष आरोप करणार, किती वर्ष दुसऱ्याच्या जीवावर सत्ता टिकवण्यासाठी धाडस करणार, दहा वर्ष सत्तेत राहून 26 पक्षाच्या टेकू घ्यावा लागतो आहे'.

'आता 26 पक्षाचा आधार घ्यावा लागतो, यातच तुमचा पराभव आहे. तुम्ही केलेल्या कामाला तुम्ही दिलेल्या जनतेच्या आश्वासनाला विसर पडला आहे. जनता तुम्हाला नाकारते आहे, हेच 26 पक्षाच्या टेकूवरून युतीवरून दिसत आहे. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा उपलब्धी सांगा, असे ते म्हणाले.

चंद्रपूर आणि पुणे निवडणुकीवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, 'निवडणुकांसाठी फार कमी कालावधी राहिला आहे. त्यासाठी लोकसभेची निवडणूक ४५ दिवस आचारसंहितेत जातील. निकालाला पुन्हा दहा दिवस लागतात, त्यामुळे केवळ नऊ महिने उरले आहेत'.

तत्पूर्वी, बच्चू कडू यांच्या मोर्च्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं.' बच्चू कडू यांना आता कोण ऐकतं हे कळून चुकलं आहे. म्हणून पुढच्या दिवसात बच्चू कडू यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे ठरवून योग्य निर्णय घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT