Vijay Vadettiwar Saam Tv
महाराष्ट्र

Vijay Vadettiwar: सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला माझा याआधीही विरोध होता, आता.. ; आरक्षणावर वडेट्टीवारांचं मोठं विधान

Vijay Vadettiwar: मराठा समाजाच्या मागणीवर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी, अशी मागणी केलीय. जरांगे-पाटील यांच्या मागणीला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केलाय. भुजबळांनी विरोधाची धार केल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध केलाय. (Latest News)

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर प्रशासन कामाला लागलंय. कुणबी नोंदी शोधण्यासाठी संपूर्ण राज्यभरात प्रक्रिया राबवली जातेय. मात्र अजित गटातील नेते छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केलाय. यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगलाय. याचदरम्यान छगन भुजबळ यांना काँग्रेस नेते आणि विरोधपक्ष नेते विजय वडेवट्टीवार यांचा पाठिंबा मिळालाय. वडेवट्टीवार यांनीही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला माझा याआधीही विरोध होता आणि आता देखील आहे. छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, अरबी समुद्रात भरती ओहोटी आहे माहीत नाही. परंतु भरती असेल तर सर्व मंत्र्यांनी सामूहिक उडी मारावी. जे समाजासाठी लढतील त्यांच्यासोबत राहणं माझं कर्तव्य आहेत. प्रत्येक नेत्यांची भूमिका विसंगत आहे? आरक्षणासंदर्भात भूमिका विसंगत आहे? भुजबळ म्हणत असतील तर ओबीसी नेते त्यांच्या बाजूने असल्याचं ते म्हणालेत.

मी ओबीसी आहे. मी मागणी केली की ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. मुख्यमंत्री तेच म्हणाले, उपमुख्यमंत्री तेच म्हणाले. परंतु शंभूराज देसाई एक म्हणतात तर दुसरीकडे भुजबळ वेगळी भूमिका मांडतात. यामुळे सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारने करू नये. जर मंत्री जर बोलत असतील तर ती सरकारची भूमिका असते, असेही विजय वडेट्टीवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT