sunil kedar News saam tv
महाराष्ट्र

Sunil Kedar News : काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का? न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

प्रविण वाकचौरे

पराग ढोबळे

Nagpur News :

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना ५ वर्षांचा शिक्षा न्यायालयाने दिल आहे. या शिक्षेनंतर त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांच्या समक्ष दोन्ही बाजूने जामीन आणि शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी युक्तिवाद झाला.

सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर त्यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज काय निकला येतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुनील केदार यांना जामीन मिळणार का? शिक्षेच्या स्थगितीबाबत न्यायाधीश काय निर्णय देतात यावर लक्ष आहे.

सुनील केदार यांची अँजिओग्राफी होण्याची शक्यता?

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना बँक रोखे घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने शुक्रवार रात्रीपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना छातीत दुखण्याचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांना ताप आणि खोकला असल्यामुळे चाचण्या लांबल्या होत्या.  (Latest News)

तसेच सिटीस्कॅनचे रिपोर्ट्स नॉर्मल आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातं आहे. यासह कोरोना टेस्ट आणि स्वाइन फ्लूची टेस्टसुद्धा निगेटिव्ह आली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र किडनीच्या त्रासामुळे क्रिएटिन लेव्हल अजूनही वाढलेली आहे. त्यामुळे आज अँजिओग्राफी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT