Ayodhya Tour Saam Tv
महाराष्ट्र

Congress Leader On BJP: 'भगवी बिकीनी चालत नाही, पण भगवा कार्पेट चालतो'; आयोध्या दौऱ्यावर काँग्रेस नेत्याचे खोचक ट्वीट!

Sachin Sawant Tweet: अयोध्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगव्या कार्पेटवरुन (Saffron CArpet) चालताना दिसले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी नुकताच अयोध्या दौरा (Ayodhya Tour) केला. या दौऱ्यावरुन आता त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगव्या कार्पेटवरुन (Saffron CArpet) चालताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी ट्वीट करत खोचक टीका केली आहे.

अयोध्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आणि भाजपचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भगवे कार्पेट टाकण्यात आले होते. या भगव्या कार्पेटवरुनच ही सर्व नेते मंडळी चप्पला घालून चालत गेले. त्यामुळे आता त्यांच्यावर टीकेची झोड सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा व्हिडिओ ट्वीट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'भगवी बिकीनी चालत नाही पण भगवा कार्पेट चालतो. बिन्धास्त पादत्राणे घालून भगवा कार्पेट तुडवा. जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळून सत्तेचा सारीपाट भाजपा कसा मांडते यांचे हे उदाहरण. दांभिकपणा हा भाजपाचा स्थायीभाव आहे. धार्मिक द्वेष पसरविण्यातून यांचे राजकारण होते पण देश कमजोर होत आहे.' असे ट्वीट करत सचिन सावंत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली होती. या भगव्या बिकिनीमुळे देशभरात राजकीय वातावरण तापले होते. या बिकिनीवरुन भाजप आणि हिंदू संघटना आक्रमक होत त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन देणार नसल्याची भूमिका भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घेतली होती. या भगव्या बिकिनीवरुन वाद निर्माण करणारे भाजप नेते आता भगव्या रंगाचे कार्पेट तुडवताना दिसले त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Pune News: पुणेकरांनो आज पाणी जपून वापरा, शहरातील 'या' भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

Ladki Bahin Yojana: लाडकीला जुलै महिन्याचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर, आजच नोट करा

SCROLL FOR NEXT