Pradnya Satav News Saam TV
महाराष्ट्र

Pradnya Satav : काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला; स्वत: ट्विट करत दिली माहिती

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती आहे.

संदीप नागरे

Pradnya Satav News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती आहे. आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करत आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं प्रज्ञा सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाल्या आमदार प्रज्ञा सातव?

"आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना, माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कुणाचेही वाईट केलेले नाही. महिला आमदारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी, मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन. कारण राजीव भाऊंचे आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांच्यासारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले आहेत. मात्र, त्यांनी घरी न बसता आपले काम सुरु ठेवले. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता", असं प्रज्ञा सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?

प्रज्ञा सातव या काँग्रेसचे (Congress) दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या काँग्रेसच्या विधानपरिषदेतील आमदार देखील आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, पक्षानं त्यांच्या जागी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं.

दुसरीकडे प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली होती. विधान परिषद पोटनिवडणुकीत त्यांची निवड बिनविरोध झाली होती. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: ८४ दिवसांसाठी जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन; कॉलिंग, मेसेजिंग अन् बरंच काही, किंमत किती?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Metro 3 : आजपासून मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत, कोणकोणत्या स्थानकावर थांबणार, तिकिटी किती असणार? वाचा

Maharashtra Politics: अजित पवार छगन भुजबळांवर नाराज, नेमकं काय घडलं बैठकीत? VIDEO

Nanded Tourism : नांदेडमध्ये लपलाय 'हा' सुंदर किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे नक्की जा

SCROLL FOR NEXT