Nana Patile vs Aaditya Thackeray
Nana Patile vs Aaditya Thackeray Saam TV
महाराष्ट्र

आमचं गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात; पटोलेंचा ठाकरेंना सूचक इशारा

अभिजित घोरमारे

भंडारा : आमचे गुड़लक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असा सूचक इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना दिला आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकारची अद्याप बैठक झाली नाही. प्रत्येक पक्षाच्या कोटा ठरलेला असून 6 व्या सदस्याबाबत अजून ही बैठक झाली नसल्याने बैठक झाल्यावर भूमिका ठरवू, असे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानावरून टोला लगावला.

नाना पटोले यांनी महापालिकेत काँग्रेसची सत्ता असतांना मुंबई कधी तुंबली नाही असे वक्तव्य नागपुरात केले होते. त्यावर त्याला आता 25 वर्षे उलटून गेली आहे. आता ते सोबतच आहेत, त्यामुळे बघुया त्याचं गुडलक कामाला येतंय का?? असे खोचक उत्तर आदित्य ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या वकव्यावर दिलं होतं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर आता नाना पटोले यांनी सूचक इशारा दिला आहे.

"पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या बाजूने मत मांडले आहे. पण आमचा गुडलकसोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. राज्यसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकारची अद्याप बैठक झाली नाही. प्रत्येक पक्षाच्या कोटा ठरलेला असून 6 व्या सदस्याबाबत अजून ही बैठक झाली नसल्याने बैठक झाल्यावर भूमिका ठरवू", असे नाना पटोले म्हणाले. आमदार निधी वाटपावरून चुकीच्या मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, असा सल्लाही पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना दिला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Detox Drinks: कडकत्या उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवेल 'ही' स्पेशल ड्रिंक

Devendra Fadnavis Meet Ganesh Naik : ठाण्यातलं नाराजीनाट्य फडणवीसांच्या भेटीने संपणार? गणेश नाईक-फडणवीस भेट होणार

PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Dummy Currency Notes | लोकसभा निवडणुकीत नकली नोटांची चलती? नकली नोटांचं रॅकेट उघडकीस!

Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

SCROLL FOR NEXT