Akshay Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर कोणाच्या आदेशाने झाला? काँग्रेस नेत्याला वेगळीच शंका

Nana Patole Question On Akshay Shinde Encounter: अत्याचार घडलेली शाळा संघाशी संबंधित व्यक्तीची असल्याने हा फेक एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यानं केलीय.

Bharat Jadhav

राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर आता संशयाच्या फेऱ्यात आलाय. या एन्काउंटरला पोलीस जबादार असल्याचा अहवाल एका तपास पथकाने दिलाय. त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत वेगळीच शंका उपस्थित केलीय. आपले पाप लपवण्यासाठी सरकारने एका निरपराध व्यक्तीची हत्या केली आहे. हे कोणाच्या आदेशाने झालं, या सगळ्या गोष्टीला गृहविभाग जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर राज्य सरकारने मोठी बॅनरबाजी केली होती. पीडितेला न्याय मिळवून दिल्याचं सत्ताधारी सांगत होते. परंतु हा एन्काउंटर संशयाच्या फेऱ्यात अडकलाय. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही यावर शंका उपस्थित केलीय. न्यायालयाने स्पष्ट केलय की, हे फेक एन्काऊंटर आहे. यातील अधिकारी आणि त्यांना आदेश देणाऱ्यांची तपासणी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

शाळेचा संघाशी संबंध

बदलापूरातील शाळेत घटना घडल्यावर पाल्यानी आवाज उचलला. ती शाळा संघाच्या माणसाची असल्याने हे फेक एन्काऊंटर केल होतं हे सिद्ध झालंय. त्या पद्धतीचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. बलात्कार केला की नाही याची माहिती माझ्याकडे नाही. संजय शिंदे या पोलीस अधिकाऱ्याकडून बंदूक हिसकावली आणि स्वतः आत्महत्या केली, असं पोलिसांनी त्यावेळी रेकॉर्डला आणलं होतं. त्यावर आलेले फिंगरप्रिंट अक्षय शिंदेचे नाही हे न्यायालयाने सांगितले.

त्यानंतर हा सगळा उलगडा झाल्याचं नाना पटोले म्हणालेत. आपले पाप लपवण्यासाठी सरकारने एका निरपराध व्यक्तीची हत्या केलीय. हे कोणाच्या आदेशाने झालं या सगळ्या गोष्टीला गृहविभाग जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस नेते पटोले यांनी केलाय.

हायकोर्टानं सीआयडीला फटकारलं

आरोपी अक्षय शिंदेचा सप्टेंबर २०२४ मध्ये एन्काउंटर झाला होता. बनावट चकमकीत अक्षयची हत्या केल्याचा आरोप करणारी याचिका त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी उच्च न्यायालयात केली होती. यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने सीआयडीला चांगलेच सुनावलं होतं. सीआयडी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे घेत नाही असे दिसते. सर्व घटनांची निष्पक्षपणे चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

दरम्यान आरोपी अक्षय शिंदेला २४ सप्टेंबरला एका दुसऱ्या प्रकरणात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून ठाण्याकडे पोलीस व्हॅनमधून नेण्यात येत होते. त्याचवेळी अक्षयने पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडील पिस्तूल हिसकावलं आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या, त्यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याला ठार केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT