H.K.Patil
H.K.Patil 
महाराष्ट्र

'वडूजच्या भूमीतून क्रांती करून पुन्हा नवा इतिहास घडवूया'

ओंकार कदम

सातारा : देशाची संपत्ती वाचविण्यासाठी काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्यासमवेत सर्व विराेधक एकवटले आहेत. हे काम केवळ त्यांचे नाही तर आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आहे असे मत भारतीय काॅंग्रेसचे प्रभारी सचिव एच.के. पाटील यांनी व्यक्त केले.

वडूज येथे आयाेजिलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित व्यर्थ न हो बलिदान,हुतात्मा अभिवादन आणि स्वातंत्र्य सैनिक सत्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे एच.के.पाटील हे बाेलत हाेते.

भारतीय काॅंग्रेसचे प्रभारी सचिव एच.के. पाटील h.k.patil म्हणाले संविधान वाचवा देश वाचवा ही माेहिम महाराष्ट्र काॅंग्रेसने सुरु केली आहे. खरे आहे ती आजच्या काळातील पुन्हा एकदा गरज बनली आहे. देशाच्या हितासाठी काॅंग्रेस जागरुकतेने सध्या घडणा-या घडामाेडींवर लक्ष ठेवून आहे. देशाच्या राष्ट्रीय संपत्ती वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी देखील माेदी सरकार कशा पद्धतीने देशाला बरबाद करीत आहेत. देशाला विकण्याचा प्रयत्न करीत आहेत याची सविस्तर माहिती नुकतीच माध्यमांना दिली. श्री. पाटील यांनी विराेधक देशाला विकल्याशिवाय राहणार नाहीत असे विविध दाखले देत नमूद केले.

या देशातील सर्व शासकीय याेजनांचे खासगीकरण करण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे. अदानी, अंबानी यांना देश विकण्याचा डाव माेदी सरकारने आखल्याचे पाटील यांनी नमूद करुन पुन्हा इस्ट इंडिया कंपनी सारखी इंग्रजांची राजवट देशात करायची आहे असा प्रश्न उपस्थित केला. काॅंग्रेसने नुकसानीत असलेले प्रकल्प फायद्यात आणण्यासाठी त्याचे खासगीकरण केले. परंतु भाजप फायद्यातील गाेष्टींचे खासगीकरण करुन देशाला विकण्याच्या तयारीत आहेत.

रेल्वे, पेट्राेलियिम या गाेष्टींचे खासगीकरण करणे चुकीचे आहे. काॅंग्रेस पक्ष देशाला विकणा-यांची गय करणार नाही. सहन करणार नाही. देशाला विकू पाहणा-यांना बाहेर काढू. महात्मा गांधी यांचा सारखा लढा उभा करण्याची वेळ पुन्हा आला आहे. ताे आपण सर्वांनी उभारु. देशाची संपत्ती वाचविण्यासाठी काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्यासमवेत सर्व विराेधक एकवटले आहेत. हे काम केवळ त्यांचे नाही तर आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आहे असे मत भारतीय काॅंग्रेसचे प्रभारी सचिव एच.के. पाटील यांनी व्यक्त केले. प्रारंभी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी देखील केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केला; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

Samruddhi Kelkar: तुझ ते लाजण अन् लाजून नाजूक हसणं...

SCROLL FOR NEXT