balasaheb thorat , bhagat singh koshyari , mumbai , maharashtra, marathi manus
balasaheb thorat , bhagat singh koshyari , mumbai , maharashtra, marathi manus saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thorat : बंधु- भावाचं वातावरण बिघडवण्याचं काम राज्यपालांनी करणं दुर्देवी : बाळासाहेब थाेरात

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

शिर्डी : राज्यपाल (governor bhagat singh koshyari) हे राज्य (maharashtra) आणि मुंबईचे (mumbai) पालक आहेत. त्यांचे वक्तव्य काळजीपूर्वक असायला हवे. भेद निर्माण करणार वक्तव्य नसलं पाहिजे. दुर्देवाने राज्यपाल यांनी कायमच असे वक्तव्य तसेच कृती केली आहे. ती राज्याच्या हिताची कधीच राहिली नाही. गुजराथी असो किंवा राजस्थानी बांधव तो जेव्हा महाराष्ट्रात आला आहे तर तो महाराष्ट्रीयन झाला आहे. बंधु - भावाचं वातावरण बिघडवण्याचे काम राज्यपालांनी करण हे दुर्देवी असं काॅंग्रेस नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी येथे राज्यपालांच्या वक्तव्यावरुन नमूद केले. (governor bhagat singh koshyari news)

अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची (Mumbai) ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी शुक्रवारी केलं हाेतं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर एनसीपी, काॅंग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागवी अशी मागणी नेत्यांच्या माध्यमातून जाेर धरु लागली आहे.

काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले सातत्याने राज्यपालांकडून असं घडत आहे. ते राज्यातील एकी बिघडविण्याच काम करीत आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्त परिस्थीती जेथे आहे जिथे नुकसान झालय तिथे जावून शेतक-यांना भेटायला हवं. हे सोडून आपल्या पाठीराख्यांचे कौतुक सोहळे करणे हे बरोबर नाही असे थाेरात यांनी नमूद केले. ते म्हणाले शिंदे फडणवीस सरकारचा केविलवाणा प्रयत्न दिसतोय. ठाेस निर्णयाची अंमलबजावणी होत असताना बिलकुल दिसत नाही. धडपड ही आमच सरकार आहे हे दाखवण्यासाठी सुरु आहे. सर्व जे गोळा झाले ते मंत्री पदासाठी झालेत. सर्वांना मंत्रीपद द्यायचे कसे हा प्रश्न त्यांना दिसतोय. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबलाय.

एक महिना सरकारला झालाय. मात्र राज्यासाठी मंत्रीमंडळ नसणे, प्रशासन नसणे दुर्देवी बाब असल्याचे थाेरात यांनी नमूद केले. ते म्हणाले मुख्यमंत्री कुठं तर दिल्लीत. शेतक-यांना मदत नाही, अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट आलं आहे. सारं प्रशासन ठप्प झालं आहे. फक्त सत्काराचे कार्यक्रम सुरू आहेत असा टाेला देखील माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदे फडणवीस सरकराला लगावला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar आणि Thackeray यांना पाहण्यासाठी इचलकरंजीकर धडपडले,नेमकं काय घडलं?

Sudhir Mungantiwar: शिवरायांची वाघनखं आणण्यास विलंब का होतोय?, सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं कारण

Uddhav Thackaeray: भाजपने केलेल्या पाडापाडीचा सूड घेणार; इचलकरंजीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Lok Sabha Election 2024 : टीएमसीपेक्षा भाजपलाच मतदान करा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Today's Marathi News Live : ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर उद्या भररणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT