Shrijaya Ashok Chavan News Saam TV
महाराष्ट्र

Shrijaya Chavan: अशोक चव्हाण यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री? कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत श्रीजया चव्हाणही सहभागी

Shrijaya Ashok Chavan News: श्रीजया चव्हाण या राजकारणात एन्ट्री करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Shrijaya Ashok Chavan Latest News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'भारत जोडो यात्रा' काल, सोमवारी रात्री ९ वाजता महाराष्ट्रात दाखल झाली. हजारो कार्यकर्ते मशाली हातात घेऊन यात्रेत सामील झाले आहेत. तेलंगणातील मिर्जापूर येथून महाराष्ट्रातील नांदेडच्या देगलूरमध्ये यात्रा आली. प्रचंड फटाक्यांची अतिषबाजीसह राहुल गांधींचे (Rahul Gandhi) स्वागत करण्यात आले आहे.

या यात्रेत कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. यावेळी चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या सुपुत्री श्रीजया चव्हाण. राजकारणापासून अद्याप लांब राहिलेल्या श्रीजया चव्हाणांचे भारत जोडो यात्रेत पोस्टर्स झळकले आहेत. त्यामुळे आता श्रीजया चव्हाण या राजकारणात एन्ट्री करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. (Congress Bharat Jodo Yatra Todays News)

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या कालच नांदेडमध्ये दाखल झाली आहे. हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सामील झाले. अनेकांच्या हातात मशाली घेतल्या होत्या. राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात आगमन होताच प्रचंड फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. यावेळी अशोक चव्हाण यांच्या सुपुत्री श्रीजया चव्हाण या राहुल गांधींसोबत सहभागी झाल्या होत्या. यावेळी परिसरात त्यांचे पोस्टर्सही झळकले होते.

श्रीजया चव्हाण या काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्या नात आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक आणि आमदार अमिता चव्हाण यांच्या त्या कन्या आहे. त्यामुळे श्रीजया यांचे राजकीय पदार्पण आता जवळपास निश्चित झाले आहे.

तेलंगाणातून महाराष्ट्रात पोहोचली यात्रा

तेलंगाणामधल्या मिर्झापूर येथून मशालसह पद यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर पदयात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला. मशाल हाती घेऊन हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते लोक सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी स्वतः आपल्या हातात मशाल घेऊन पुढे होते.

प्रचंड उत्साह आणि भारत जोडोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मशाल यात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. ८ वाजून ५० मिनिटाला सुरू झालेली मशाल पदयात्रा चाळीस मिनिटे पुढे येऊन देगलूरमध्ये पोहचली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloe Vera Juice: घरी कोरफडचा रस कसा बनवायचा? सोपी आहे पद्धत

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT