Maha Vikas Aghadi  Saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election: विधानसभेसाठी काँग्रेस लागली कामाला, 288 जागांवर चाचपणी सुरू; ठाकरे-पवारांचं टेंशन वाढणार?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यातच काँग्रेसने राज्यातील 288 मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवलेत. त्यामुळे ही काँग्रेसची रणनिती की महाविकास आघाडीत दबावतंत्र? याचीच चर्चा रंगलीय. मात्र संघटनात्मक उत्साह वाढवण्यासाठी 288 जागांवर अर्ज मागवल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलंय.

लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने 31 जागांवर विजय मिळवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय. त्यातच काँग्रेसच्या सर्वाधिक 13 आणि 1 अपक्ष अशा 14 जागा निवडून आल्याने काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढलीय. त्यातच आता काँग्रेसने नाना पटोलेंच्या निर्देशानुसार राज्यातील 288 जागांवर इच्छूकांचे अर्ज मागवून मोठा डाव टाकलाय.

काँग्रेसने राज्यातील सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज मागवले आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण खुल्या वर्गातील जागेसाठी 20 हजार रुपये पक्षनिधी तर अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि महिलांना 10 हजार रुपये पक्षनिधी म्हणून रोख किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नावे डीडी द्वारे किंवा जिल्हा कमिटीकडे जमा करावा लागणार आहे. तसंच बंडखोरी टाळण्यासाठी इच्छुकांना हमीपत्र द्यावं लागणार आहे.

लोकसभेनंतर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी झाली तर ऐनवेळी धांदल उडू नये, म्हणून काँग्रेसने रणनिती आखल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे ही काँग्रेसची रणनिती असो वा दबावतंत्र? यातून महाविकास आघाडीतील इतर पक्ष काय भूमिका घेणार? यावरच विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : हर्षवर्धन पाटलांनंतर आता रामराजे तुतारी हाती घेणार? मोठी अपडेट आली समोर

Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ, हिंडेनबर्गच्या आरोपांची होणार चौकशी

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT