Maharashtra Politics: 'महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार'

Supriya Sule on Maharashtra Government: आज सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधायला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Maharashtra Politics: 'महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार'
Supriya Sule on Maharashtra GovernmentSaam Tv

महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार आहे, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. महागाई, बेरोजगारीत वाढ झाली आहे. दुधाला भाव मिळत नाही. सतत धोरण बदलणारं हे भ्रष्टाचारी सरकार असल्याची टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, कालच एक जण मला म्हणाला की, हे एमबीबीएस सरकार आहे. पण मला डॉक्टरांना दुखवायचं नाही, त्यांची बदनामी मला करायची नाही. आज बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्या असं म्हणल्या आहेत.

जोगेश्वरी भूखंड प्रकरणी शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना क्लीन सिट मिळाली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''भारतीय जनता पक्ष स्वातंत्र लोकांवर आरोप करतात. त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारांची टोळी आहे.''

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार'
Police Bharti: पोलीस भरतीवेळी धावताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळला, २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

त्या म्हणाल्या की, '' ते भ्रष्टाचारी आहेत की, नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. जे महाराष्ट्रातले आमदार, खासदार आज तुमच्याबरोबर आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केले, ते सिद्ध झाले नाही. खरं काय खोटं काय? याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे. नक्की राज्यात भ्रष्टाचार कोण करत आहे.''

अजित पवारांना लिहिलं पत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, ''पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलं आहे. याचं कारण की, अमोल कोल्हे आणि मला निधी मिळत नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. आम्ही निवडून आलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. पाच टक्क्यांचा तर आमचा अधिकार आहे ना? आम्ही आमच्या कामसाठी निधी मागत नाही. लोकांचा विकास हवा आहे. आम्हाला क्रेडीट नको. आमचं काम आहे, लोकांच्या सेवेसाठी आम्ही निधी मागत आहे.''

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार'
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग; या जिल्ह्यातील सर्व जागांचीही केली घोषणा? राज्यात किती जागा लढवणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादी चिन्ह प्रकरणी त्या म्हणाल्या, ''आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना जबाबदारी दिली. त्यामुळे शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचं असून चिन्हही त्यांचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फाउंडर पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली. जेव्हा ते चिन्ह लावतात तेव्हा त्याच्या खाली लिहायला पाहिजे कोर्टाने त्यांना आदेश दिले आहेत. पण कोर्टाच्या विरोधात ते वागतात हा कोर्टाचा अपमान आहे. आम्ही या विरोधात कोर्टात जाणार आहोत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com