amravati news  Saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचा बडा नेता फोडला; शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन करणार शिवसेनेत प्रवेश

amravati politics : एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचा बडा नेता फोडला आहे. अमरावतीमधील हा नेता शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

Vishal Gangurde

अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार

सुधाकार भारसाकळे यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार

अमर घटारे, साम टीव्ही

आगामी निडवणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता अमरावतीमधील आणखी एक नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालं आहे. अमरावतीच्या दर्यापुरातील काँग्रेस नेते सुधाकार भारसाकळे हे शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. भारसाकळे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

अमरावतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमरावतीमधील सहकार नेते आणि काँग्रेसचे माजी दर्यापूरचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी आज मंगळवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. या कार्यकर्ता मेळाव्यात सुधाकर भारसाकडे यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सुधाकर भारसाकडे हे समर्थकांसह शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. सुधाकर भारसाकडे यांच्या कार्यकर्ता मेळावात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात सुधाकर भारसाकळे म्हणाले, 'मी नवी वाट शोधली आहे. त्या वाटेने मला जायचं आहे. तुम्ही त्यासाठी माझ्यासोबत राहाल. एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. लवकरच म्हणजे दोन-तीन दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. दबंग नेतृत्व बच्चू कडू हे सोबत राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातून तुमच्या साक्षीने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तुम्ही मला आशीर्वाद द्याल. मला ताकद द्याल. काँग्रेसला मोठं केलं, त्या पद्धतीने शिवसेनेलाही पुढे नेऊ'.

'तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. इतक्या ऊन्हातही मेळाव्याला उपस्थित राहिलात. माझ्यावर प्रेम दाखवलं. माझ्यावरील प्रेम सदैव राहावं. तुम्हाला चुकीच्या वाटेवर घेऊन जाणार नाही. ही तुम्हाला ग्वाही देतो, असे भारसाकळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT