National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

National Film Awards ceremony to be held in Gujarat for first time : ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनाचं ठिकाण बदलण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा आता दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार आहे.

National Film Awards 2026 venue changed to Kevadia Gujarat : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या वितरणाच्या ठिकाणात पहिल्यांदाच बदल करण्यात आलाय. ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर होणार आहे. गुजरातमधील केवडिया इथं पुरस्कार सोहळा पार पाडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २२ सप्टेंबरला पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. १९५४ मध्ये पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित केला होता.

दरम्यान, आर्टिकल 370 या चित्रपटाला बेस्ट फीचर फिल्म आणि त्यातील प्रमुख अभिनेत्री यामी गौतम हिला बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार घोषित झाला आहे. मल्याळम सुपरस्टार ममुटी आणि बॉलिवूडचा स्टार कार्तिक आर्यन यांना ब्रह्मयुगम आणि चंदू चॅम्पियनमधल्या भूमिकांसाठी बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेता आणि चित्रपट निर्माता रणदीप हुड्डा याला विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू डायरेक्टरचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com