Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

Shruti Vilas Kadam

बेकिंग सोड्याचा पेस्ट

बेकिंग सोडा अतिरिक्त तेल आणि डेड स्किन हटवण्यास मदत करू शकतो. एक चमचा बेकिंग सोडा दोन चमचे पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावून १५-२० मिनिटांनी धुवा.

Skin Care | Saam Tv

एग वाइट आणि शहद

अंड्याचा पांढरा भाग आणि एक चमचा शहद एकत्र करून मास्क तयार करा. ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने काढून चेहरा कोमट पाण्याने धुवा.

Face care | Saam tv

दालचिनी आणि लिंबाचा उपाय

दालचिनी आणि लिंबाचा वापर करून तयार केलेला पेस्ट ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, संवेदनशील त्वचेवर लिंबामुळे जळजळ होऊ शकते.

Skin care | Saam tv

ग्रीन टी पॅक

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. कोरड्या ग्रीन टीच्या पानांमध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. हा पॅक ब्लॅकहेड्सवर लावून २० मिनिटांनी धुवा.

Skin Care | Saam TV

हळद आणि नारळाचे तेल

एक चमचा हळदीमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा. ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करून १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवा. हळदीमुळे तात्पुरते पिवळे डाग पडू शकतात.

Skin Care | Pintrest

ब्लॅकहेड्स का होतात?

त्वचेवर जास्त सीबम, डेड स्किन आणि घाण जमा होऊन पोर्स बंद होऊ शकतात. हवेच्या संपर्कात आल्यावर हे ऑक्सिडाइज होतात आणि काळे दिसतात. ऑयली आणि कॉम्बिनेशन त्वचेमध्ये ही समस्या अधिक दिसू शकते.

Face Care | Saam tv

जास्त ब्लॅकहेड्स असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या

खूप जुने, खोल किंवा मोठ्या प्रमाणात ब्लॅकहेड्स असल्यास स्वतःहून काढण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे त्वचेवर वेदना किंवा इन्फ्लेमेशन होऊ शकते. अशावेळी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Face Care | Saam Tv

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

No Makeup Look | Saam Tv
येथे क्लिक करा