Shruti Vilas Kadam
नो-मेकअप लूकसाठी सर्वात आधी त्वचेची योग्य तयारी करा. स्किन टाइपनुसार क्लेंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा. हायड्रेटिंग सीरम वापरत असल्यास अगदी थोड्या प्रमाणात लावा.
फाउंडेशनपासून सुरुवात करण्याऐवजी हलका, शीअर क्रीम ब्रॉन्जर वापरा. चीकबोन्स, कपाळ, टेंपल आणि जॉलाइनवर लावून हेअरलाइनच्या दिशेने व्यवस्थित ब्लेंड करा.
संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याची गरज नाही. रेडनेस, डाग किंवा डार्क सर्कल्स असलेल्या भागावरच थोडे फाउंडेशन किंवा कंसीलर लावा.
नो-मेकअप लूकमध्ये ब्लश अधिक प्रमाणात लावणे टाळा. हसल्यावर गालांवर जिथे नैसर्गिक लालसरपणा दिसतो, तिथे अगदी थोडा ब्लश लावा.
नॅचरल लूक हवा असेल तर संपूर्ण चेहऱ्यावर पावडर लावू नका. गरज असल्यास फक्त डोळ्यांखाली किंवा ऑयली टी-झोनवर अगदी पातळ लेअर वापरा.
आयब्रोमध्ये जिथे केस कमी आहेत तिथेच हलके स्ट्रोक द्या आणि जेलने सेट करा. मस्कारा फक्त एक लेअर लावा, ज्यामुळे पापण्या डिफाइन होतील पण ओव्हर-मेकअप दिसणार नाही.
डार्क लिपस्टिकऐवजी हलका लिपलाइनर वापरून तो आतल्या बाजूला ब्लेंड करा. त्यावर टिंटेड लिप बाम लावा. यामुळे ओठांना नैसर्गिक आणि फ्रेश लूक मिळतो
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.