Navneet Rana Saam tv
महाराष्ट्र

Amravati News: नवनीत राणांविरोधात कॉंग्रेस आक्रमक, निवडणूक आयोगाकडे खासदारकी रद्द करण्याची मागणी; काय आहे प्रकरण?

Navneet Rana Vs Yashomati Thakur: खासदार नवनीत राणा आणि कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यामधील वादाने अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी

Amravati Politics News:

खासदार नवनीत राणा आणि कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यामधील वादाने अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यावर आता कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत काँग्रेस कडून खासदार नवनीत राणा याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असे त्या म्हणाल्या होत्या.

यावर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात १०० कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अमरावती जिल्हाधिकारी मार्फत काँग्रेसच्या अनुसूचित जातीच्या जिल्हाध्यक्ष कडून राणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

नवनीत राणा यांच्या या आरोपाची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी, यशोमती ठाकुर यांना नवनीत राणा यांनी जे पैसे दिले, त्याचा हिशोब निवडणूक आयोगाकडे दिला का?त्याची सखोल चौकशी करावी ,नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी काँग्रेस कडून या वेळी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT