Thackeray Family  Saam TV
महाराष्ट्र

Thackeray Family: ठाकरे कुंटुंबात वाद? आदित्य आणि तेजस युवासेनेवरुन आमने-सामने? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Political News : शिवसेनेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय.

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारे

Sindhudurg News : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दोघांमध्ये वादही झाला होता, असा दावा नितेश राणेंनी केला आहे.

बाळासाहेब आणि मा साहेबांच्या वैयक्तिक संबंधांवर संजय राऊतांनी लोकप्रभामध्ये असताना प्रश्न विचारला होता. पवार कुटुंबियातही भांडणे लावण्याचे काम सुरू केले आहे. संजय राऊतांना अजित पवारांनी खडसावले, पवार साहेबही बोलले आहेत. (Latest Marathi News)

शिवसेनेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय. म्हणून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात संजय राऊतांनी भांडण लावलं. आदित्य ठाकरे यांचं वाढतं प्रस्थ कमी करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात भांडणं लावण्यात आलं. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये वादही झाल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.

युवासेना प्रमुख म्हणून वरूण सरदेसाईंच नाव पुढे येत होतं, ते अचानक गायब झालं. युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई झाल्यास आदित्य ठाकरेंची ताकद वाढेल. त्यामुळे तेजस ठाकरेंच्या नावाने सामनामध्ये जाहिरात झापून आणली जायची. तेजस ठाकरेंचे बॅनर लावायला महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांना सांगितलं जायचं, असाही दावा नितेश राणेंनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC उत्तीर्ण मुलाची गावातून भव्य मिरवणूक; आईला खांद्यावर घेऊन व्यक्त केला आनंद

PCOS Symptoms : मासिक पाळी नियमित तरी PCOS असू शकतो? ‘ही’ लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

Goverment Jobs : MPSC मार्फत परीक्षेची मागणी! CID मधील भरती प्रक्रियेवर परीक्षार्थींचा आक्षेप, 'त्या' ८ मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

Mumbai Crime: नवरा-बायकोच्या भांडणानंतर घरात भयानक थरार, मुंबई हादरली

शरद पवारांना मोठा धक्का! दोन दिग्गज नेत्यांसह 11 नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT