Beed Dr. Sudam Munde Case
Beed Dr. Sudam Munde Case  विनोद जिरे
महाराष्ट्र

वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर; डॉ. सुदाम मुंडेला जामीन मंजूर

विनोद जिरे

बीड: राज्यात गाजलेल्या अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. सुदाम मुंडे याला १५ हजारांच्या बंधपत्रासह वैद्यकीय व्यवसाय (Medical profession) न करण्याच्या आणि इतर अटी व शर्तीवर, औरंगाबाद (Aurangabad) हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अवैध गर्भपात प्रकरणी मुंडेला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. त्यानंतर मुंडेला औरंगाबाद हायकोर्टाने (High Court) ५ वर्ष वैद्यकीय सेवा न करण्याच्या अटीवर जामीन (Bail) दिला होता .

हे देखील पाहा-

मात्र, त्यानंतरही परळीतील रामनगर भागात डॉक्टर मुंडे हा खुलेआम रुग्णालय (Hospital) चालवायचा. यादरम्यान तक्रार आल्याने ५ सप्टेंबर २०२० रोजी, आरोपी मुंडेच्या दवाखान्यावर छापा टाकला होता. यावेळी तिथे ४ रुग्ण उपचार घेताना आढळले होते. तसेच वैद्यकीय उपकरणे व साहित्य सापडले होते. या छाप्यावेळी डॉ . सुदाम मुंडे याने सर्व पथकाला धमकी (Threat) दिली व सरकारी (Government) कामात अडथळा निर्माण केला. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले होते.

याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंबाजोगाई (Ambajogai) जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुंडेला सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड कलम (२) वैद्यकीय व्यवसाय कायद्यान्वये १ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाच्या विरोधात आरोपी मुंडेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. या प्रकरणात आता डॉक्टर सुदाम मुंडे याला, पुन्हा एकदा अटी शर्थी घालत, औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश आर.बी.अवचट यांनी जामीन मंजूर केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

Ajit Pawar : निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT