Beed Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Crime News: बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! हॉटेलमध्ये घुसून बेदम मारहाण, तरुण गंभीर जखमी; VIDEO व्हायरल

Violent Assault in Beed City: बीड शहर पुन्हा एकदा मारहाणीच्या प्रकरणावरून चर्चेत आला आहे. मारहाणीत पीडित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच डोक्याला ३ टाके पडले आहेत.

Bhagyashree Kamble

घरासमोर नालीतील घाण टाकली म्हणून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ३ टाके पडले आहेत. ही धक्कादायक घटना बीड शहराच्या मोमिनपुरा भागात घडली आहे. या प्रकरणानंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बीड शहर पुन्हा एकदा मारहाणीच्या प्रकरणावरून चर्चेत आला आहे. मोहम्मद खलील राशिद या तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. नजीब खान उस्मान खान आणि खिजर खान शरीफ खान या दोघांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून तरूणावर फायटरने हल्ला केला आहे.

या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच डोक्याला ३ टाके पडले आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी आणि पीडित व्यक्ती हे एकाच गल्लीत राहतात.

काही दिवसांपूर्वी आरोपीने मोहम्मदच्या घरासमोर नालीतील कचरा टाकला होता. नंतर मोहम्मदने तक्रार दाखल केली. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ही संपूर्ण घटना १९ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल शालीमारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बीड शहरात खुलेआम गुंडाराज आणि वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार का? कायद्याचा धाक आहे का? असे सवाल नागरीकांमध्ये उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT