Divorce News: भयंकर! मासिक पाळीत ना आंघोळ, खोलीतही डांबलं; जाचाला कंटाळून बायकाेने नवऱ्याला दिला घटस्फोट

Divorce Due to Family Superstitions: मासिक पाळीशी संबंधित प्रथांच्या निषेधार्थ भोपाळमधील एका महिलेनं तिचे लग्न मोडलंय. मासिक पाळीच्या काळात तिला भेदभाव सहन करावा लागला होता.
Periods Superstition
Periods SuperstitionSaam Tv News
Published On

महिलांसाठी आठवड्यातील ४ दिवस अत्यंत महत्वाचे असतात. मासिक पाळी दरम्यान भारतातील काही घरांमध्ये काही नियम असतात. काही महिला एकाच खोलीत बसून असतात. किंवा स्वयंपाकघरात जाणं टाळतात. याच काही प्रथांच्या निषेधार्थ एका महिलेनं मोठं पाऊल उचललं आहे. प्रथेवरून सासरची मंडळी घालत असलेल्या बंधनामुळे तिनं आपलं लग्न मोडलंय. ही धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे.

मासिक पाळीशी संबंधित प्रथांच्या निषेधार्थ भोपाळमधील एका महिलेनं तिचे लग्न मोडलं आहे. मासिक पाळीच्या काळात तिला भेदभाव सहन करावा लागला होता. सासरची मंडळी महिलेला खोलीत बंद करून ठेवत होते. तसेच आंघोळ करू देत नव्हते. तिने यासंदर्भात पतीला याची माहिती दिली. मात्र, पतीनं देखील यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. याच गोष्टींना कंटाळून महिलेनं सासरचं घर सोडलं. नंतर पतीला तिनं घटस्फोटही दिला.

Periods Superstition
Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर

पती आणि पत्नीचं वय ३० आहे. दोघांनीही अरेंज मॅरेज केलं होतं. तो व्यक्ती पुजारी आहे. भोपाळजवळील एका छोट्या गावात त्यांच्या पालकांसोबत तो राहत आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले आनंदात गेले. मात्र, काही दिवसानंतर महिलेला लक्षात आले की, तिचे कुटुंब पारंपारिक आणि जुन्या प्रथांमध्ये अडकले आहे. यामुळे महिलेला खुप त्रास सहन करावा लागला.

Periods Superstition
Income Tax Raid Satara: रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चुलत भावांच्या घरी आयकर विभागाचा छापा

जेव्हा तिचा पतीही या गोष्टींना विरोध करू शकला नाही, तेव्हा महिलेनं पतीसोबत काडीमोड घेण्याचे ठरवले. मासिक पाळीचे ४ दिवस महिलेला स्वयंपाक घर किंवा पुजा कक्षेत प्रवेश बंदी होती. तिला एका बंद खोलीत राहण्यास सांगितले. इतकंच नाही तर, सासूने तिला आठवडाभर आंघोळही करू दिली नाही. याच त्रासाला कंटाळून लग्नाच्या ४ महिन्यांनंतर महिला सासरचं घर सोडून माहेरी गेली.

यानंतर दोघांनीही परस्पर संमतीनं भोपाळ जिल्हा कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. हा अर्ज हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(ब) अंतर्गत होता. न्यायालयाने अर्ज मंजूर केला आणि घटस्फोटाचा आदेश जारी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com