Jalgaon
Jalgaon Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon News: 'एक मुलगी माझ्याशी बोलत नाही, इतर मुलांशी बोलते', विद्यार्थ्यांने कॉलेजमध्येच संपवलं जीवन

संजय जाधव, साम टीव्ही

जळगाव : कुणाच्या भावना कशा आणि कधी दुखावतील हे सांगता येत नाही. जळगावातील एका विद्यार्थ्याने एक मुलगी आपल्याशी बोलत नाही या क्षुल्लक कारणावरून जीवन संपवलं आहे. घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. महाविद्यालयातील वर्गातच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सूरज असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मृत्यूपूर्वी त्याने एक सुसाईड नोटही लिहली आहे.

एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते, अशी सुसाइड नोट लिहून या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. काल सायंकाळी सुरक्षा रक्षकाच्या ही घटना लक्षात आल्यावर तत्काळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व पोलिसांना माहिती देण्यात आली. मृत विद्यार्थी जळगाव जामोद तालुक्यातील येणंगाव येथील रहिवाशी होता. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरु केली आहे. (Latest News Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Tiwari: बोल्ड सुंदरी; पलक तिवारी! फोटो

DC vs MI, IPL 2024: टीम डेव्हिडच्या षटकाराने फॅन गंभीर दुखापत; Video तुफान व्हायरल

Sharad Pawar: PM मोदींची देश चालवण्याची पद्धत पाहून चिंता वाटते, शरद पवारांचे परखड मत

Aamras: आमरस केल्यानंतर काळा पडतोय?तर त्याआधी करा 'या' गोष्टी

Today's Marathi News Live: पुढील २४ तासात उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून केली जाणार

SCROLL FOR NEXT