IAS Aanchal Goyal Travel By Bullock Cart Video
IAS Aanchal Goyal Travel By Bullock Cart Video राजेश काटर
महाराष्ट्र

Video : डॅशिंग जिल्हाधिकाऱ्यांनाच करावा लागला बैलगाडीने प्रवास; आंचल गोयल यांना बकाल रस्त्यांचा खराब अनुभव

राजेश काटकर

परभणी: परभणी जिल्ह्यातील बकाल रस्त्यांचा (Bad Roads) अनुभव आता जिल्हाधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal) यांनाही आला आहे. मानवत तालुक्यातील पालोदी (Parbhani) येथे वृक्षारोपण आणि बचत गटाला भेट देण्यासाठी त्या जात होत्या. मात्र, त्यांची गाडी खराब रस्त्यामुळे आणि चिखलामुळे गावापर्यंत जात नसल्याने त्यांना चक्क बैलगाडीत बसून गाव गाठावे लागले. यावरुन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना जिल्हातील ग्रामीण भागातील रस्त्यांची काय दयनीय अवस्था झाली आहे याचा अनुभव आला आहे. (Aanchal Goyal Latest News)

हे देखील पाहा -

आंचल गोयल या एक डॅशिंग आयएएस ऑफिसर म्हणून ओळखल्या जातात. मात्र, त्यांनाच बकाल रस्त्यामुळे बैलगाडीतून प्रवास करावा लागल्याने रस्त्यांची काय दुर्दशा आहे हे लक्षात येते. मंत्र्यांनी चांगल्या रस्त्यांबाबत वेळोवेळी केलेले दावे फोल ठरल्याचे स्पष्ट होते.

कोण आहेत आंचल गोयल?

आयएएस अधिकारी आंचल गोयल यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रं न सोपवता ३१ जुलै २०२१ ला अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. यावरून परभणीत आंदोलने झाली होती. आंचल गोयल या डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या अशी चर्चा जिल्हाभरात रंगत होती. त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या दबावापोटी अखेर सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केल्याच्या चर्चा होत्या. मात्र, परभणीकर जनतेच्या रेट्यापुढे मुख्यमंत्री कार्यालय नमले आणि शासनाने, नेते व कार्यकर्ते यांच्या दबावाला बळी न पडता आंचल गोयल यांना पुन्हा एकदा परभणीचे जिल्हाधिकारी पद स्वीकारण्याची जबाबदारी दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT