Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Cold Wave Alert : पारा घसरला, दबबिंदू गोठले; १४ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा, वाचा IMD चा अंदाज

Maharashtra cold wave, IMD alert : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून १४ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा आयएमडीने दिला आहे. जळगाव, निफाड, धुळे, नाशिकसह अनेक ठिकाणी तापमान ७ ते ९ अंशांपर्यंत घसरले आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

  • महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

  • जळगावमध्ये ७.१ अंश तर निफाडमध्ये दबबिंदू गोठण्याइतकी थंडी नोंदली.

  • धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, परभणी आदी ठिकाणी किमान तापमानात मोठी घसरण.

  • पुढील दोन ते तीन दिवस राज्यात थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला.

Maharashtra Weather Update : उत्तरेकडील हाडं गोठवणारी थंडी महाराष्ट्रात धडकली आहे. हवमान विभागाकडून राज्यात थंडीच्या तीव्र लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणाचा पारा ७ अंशावर खाली घसरल्याने निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये तापमान अधिकच घसरल्याने दबबिंदू गोठल्याचे दिसून आले. आज (ता. १९) उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा आला आहे. त्याशिवाय उर्वरित राज्यात गारठा कायम राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीचा इशारा देण्यात आळा आहे. (Maharashtra cold wave IMD forecast temperature drops)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पारा दहा अंश आणि त्यापेक्षा कमी झाला आहे. उत्तरेकडून गोठविणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक किमान तापमान जळगावमध्ये नोंदवले गेलेय. जळगाव मध्ये ७.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

कुठे कुठे थंडीचा इशारा?

थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली.

राज्यातील थंडीची तीव्र लाट असलेली ठिकाणे : धुळे ६.२, जेऊर ७, परभणी (कृषी) ७, जळगाव ७.१, निफाड ८.३, अहिल्यानगर ८.४.

पाहा राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)

अहिल्यानगर: ८.४

नाशिक: ९.२

यवतमाळ: ९.६

जळगाव: ७.१

मालेगाव: ९.६

गोंदिया: ९.६

पुणे: ९.४

नागपूर: १०.४

अमरावती: ११.४

महाबळेश्वर: १०

सातारा: १०.६

सांगली: १२.३

सोलापूर: १३.९

परभणी : ७

थंडीचा जोर वाढल्याने यवतमाळ जिल्हा गारठला

सातत्याने तापमानात घट होत असून विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा जोर कायम असून पारा 9.6 अंशावर स्थिरावला. दिवसाचे तापमान 29 अंशावर असून रात्रीच्या तापमानात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुपारी चारनंतर हुडहुडी भरू लागली आहे. आणखी तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जळगाव जिल्ह्यात पहाटेचा पारा सात अंशांवर

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने रात्री व पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. आज पहाटे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी तापमान ७ ते ८ अंशांपर्यत खाली आल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून, जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जळगाव येथे ७ ते ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत किमान तापमान १० ते १३ अंशांपर्यंत घसरले. हवामान विभागाने अजून दोन तीन दिवसांपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree : अस्सल बनारसी साडी ओळखण्याच्या ७ ट्रिक्स

Shocking : भंडाऱ्यात हत्येचा थरार! धारदार शास्त्राने हत्या केली, मृतदेह रेल्वेरुळाजवळ नाल्यात फेकला

Maharashtra Politics: विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेसला खिंडार; २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

De De Pyaar De 2 Collection : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 50 कोटींच्या उंबरठ्यावर, मंगळवारी कमाई किती?

Maharashtra Government: गुंठेधारकांसाठी खुशखबर! आता सातबाऱ्यावर नाव लागणार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT