Maharashtra Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात गारठा वाढला, 'या' जिल्ह्यात कडाक्याची थंडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Winter Season: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून थंडीची लाट आली आहे. हवामान विभागाने कोरड्या हवामानासह थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

Alisha Khedekar

राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने गारठा जाणवतो आहे

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान १० अंशांच्या खाली घसरले

हवामान विभागानुसार पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील

नागरिकांना सकाळी गारठा तर दुपारी उकाडा जाणवत आहे

उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आली आहे. आज राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईसह पुणे , विदर्भ, मराठवाडा गारठल्याचं पाहायला मिळत आहे.

बंगालच्या उपसागरात समुद्रापासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता आणि उकाडा कायम आहे. तर पहाटे गारठा वाढला आहे. त्यामुळे सकाळी थंडी तर दुपारी उकाडा अशी स्थिती नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

काल म्हणजेच सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎रत्नागिरी येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे हंगामातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जेऊर, जळगाव, निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आहे.

तापमानाचा पारा १० अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आली असे समजले जाते. राज्यात गारठा वाढत असून, सकाळच्या सुमारास धुक्यासह दव पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज राज्याच्या किमान तापमानात घट होत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, जळगाव, कोकण या भागात गुलाबी थंडीची चादर पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! 24 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना मृत्यूदंडाची शिक्षा; जगभरात खळबळ

SCROLL FOR NEXT