Shivsena MLA Kailas Patil saam tv
महाराष्ट्र

आमदार कैलास पाटील डबल ढोलकी, शिवसेनेच्या माजी मंत्र्यांचा गौप्यस्फोट

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंड केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंड केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे ३० हून अधिक आमदार शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आमच्यासोबतच असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. अशातच शिंदे यांच्या गोटातून आमदार कैलास पाटील (kailash Patil) आणि नितीन देशमुख स्वगृही परतल्याने शिवसेनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नुकतीच ट्विटरवर दिली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. डबल ढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी सावध राहावं, असं खळबळजनक वक्तव्य सावंत यांनी केलं आहे.

माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी आमदार कैलाश पाटील यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केलीय. सूरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची व्यवस्था पाटील यांना आम्ही करुन दिली.

प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेलो, असा दावा पाटील यांनी केला होता. तो सपशेल खोटा आहे. कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैवी आहे. डबल ढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुखांनी सावध राहावं, असं आवाहन तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - रोहिणी खडसे कोर्ट रूम मध्ये दाखल

Pink E- Rickshaw Scheme: पिंक रिक्षा योजना काय आहे? कोणाला मिळते ही रिक्षा

Ghashiram Kotwal: 'घाशीराम कोतवाल' हिंदी रंगभूमीवर; ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा झळकणार मुख्य भूमिकेत

Madhuri Elephant : माधुरी हत्तीला गुजरातला हलविल्याचा निषेध; जैन समाजाकडून आंदोलन, रिलायन्स उत्पादनावर बहिष्काराचा केला ठराव

Malegaon Blast Verdict: दहशतवाद आणि जिहादचा रंग हिरवाच; मालेगाव खटल्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT