CM Uddhav Thackeray Latest News
CM Uddhav Thackeray Latest News Saam Tv
महाराष्ट्र

CM उद्धव ठाकरे यांचा राजीनामा! म्हणाले, बाळासाहेबांच्या पुत्राला खाली खेचण्याचं काम बंडखोरांनी केलं

नरेश शेंडे

मुंबई : एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि महाविकास आघाडी सरकारचा (mva government) जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. शिवसेनेकडून बहुमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिक दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या ३० जूनलाच बहुमत चाचणीला समोरं जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने बहुुमत चाचणीची स्थगिती रोखली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्याचाही राजीनामा दिला आहे.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हणाले, उद्या नवीन लोकशाहीचा पाळणा हालणार आहे, उद्या सर्व शिवसैनिकांनी शांत राहा. लोकशाहीचा जल्लोष झाला पाहिजे. कुणीही शिवसैनिकांनी त्यांच्यामध्ये येऊ नये, लोकशाहीमध्ये फक्त डोक्याचा वापर संख्या मोजण्यासाठी होतो. पण माझ्या विरोधात किती आहेत, याच्यात मला रस नाही, ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं. त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य करुद्या, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला हे माझं पाप आहे.

तुमच्या सहकार्याने आजपर्यंच चांगली वाटचाल झाली. बळीराजाला कर्जमुक्त केलं आहे. पिक विम्याचं पॅटर्नही केलं आहे. मला विशेष समाधान आहे, आयुष्य सार्थकी लागलं. शिवसैनिकांच्या मागणीप्रमाणे औरंगाबादला संभाजीनगर नामांतर केलं. उस्मानाबादला धाराशीव नाव दिलं. जे सरकारी कर्मचारी काम करतात त्यांना वांद्रे येथे भूखंड दिला. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे खास धन्यवाद मानतो.

मला एका गोष्टीचा खेद वाटला, की या ठरावाच्या वेळेला माझ्यासह आदित्य ठाकरे, अनिल परब आणि सुभाष देसाई हे चार मंत्री होते,. बाकी सर्व मंत्री तुम्हाला माहिती आहेत. प्रस्तावाला मंजूरी देत असताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने विरोध केला नाही आणि तातडीनं मंजूरी दिली. शिवसेनेला ५६ वर्षे झाली. लहानपणापसून मी शिवसेना अनुभवत आलेलं आहे. साध्या पाण टपरी वाल्यांना, सर्व सामान्य नागरिकाला वंदनीय बाळासाहेबांनी नगरसेवक, आमदार ,खासदार केलं. जे मोठे झाले आहेत, आता त्यांना विसर पडला आहे.

ज्यांना आपण जितकं देता येतील तेवढं दिल. मातोश्रीवर येवून साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत,असं शिवसैनिक म्हणत होते. पण ज्याला दिलं तो मात्र विसरला आहे. न्यायदेवताचा निकाल आपल्याला मान्य असला पाहिजे. फ्लोर टेस्टचा आदेश . राज्यपालांना धन्यवाद, काही लोका्ंनी पत्र दिल्यावर आपण तातडीनं आदेश दिले. जवळपास दीड - पावणे दोन वर्ष लांबलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांची निवड केली तर बरं होईल.

काल सुद्धा मी आवाहन केलं होतं, तुमची नाराजी कोणावर आहे, नामांतर करुनही शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असं म्हणत असतील तर काय बोलावं, आजही सांगतोय तुमच्या भावनांचा आदर करतो, काय आहे ते समोर येवून बोला. अनेक शिवसैनिकांना नोटिसा दिल्या जात आहेत. चिन बॉर्डरची सुरक्षा पण काढतील, सीआरपीफचे जवान तैनात करण्यात येत आहेत. मोठा बंदोबस्त ठेवला जातोय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ghatkopar Hoarding Collapse: कारमध्ये पेट्रोल भरायला गेले अन् जीव गमावून बसले; मुंबईतील दाम्पत्याची हृदयद्रावक कहाणी

Today's Marathi News Live : प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या वडिलांच्या कारवर अज्ञातांचा हल्ला

Pandharpur News : विठुरायाला ८ लाखाचा सोन्याचा हार; हैद्राबाद येथील महिला भाविकाकडून अर्पण

Maharashtra Rain News : राज्याला आजही अवकाळीचा तडाखा; वादळीवाऱ्याने रायगडला झोडपलं, पाहा Video

Tuljapur: तुळजाभवानी संस्थांकडून भेदभाव? पाळीकर पुजा-यांचे जिल्हाधिका-यांना गा-हाणे; नेमकं घडलय काय?

SCROLL FOR NEXT