Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

बंडखोर आमदारांबाबत शिवसेनेच्या बैठकीत चर्चा नाही, CM ठाकरेंनी आखली नवी रणनीती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेने नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळं शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांनी जवळपास ४० समर्थक आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकारची (mva government) गोची झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून शिवसेनेने मुंबईत नवी रणनीती आखण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांबाबत चर्चा झाली नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या पुढील रणनीतीसाठी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्ष वाढवण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे गटाबाबत आणि सोडून गेलेल्या आमदारांविषयी बैठकीत कोणतीही चर्चा केली नाही. विभागावर लक्ष द्या आपण ताकदीने लढू, असं म्हणत ठाकरे यांनी शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढवला. तसेच विभागवार मेळावे लावाल शाखा शाखा पिंजून काढा.

जे गेले त्यांचा विचार करु नका. आपल्याला आणखीन ताकदीनं लढायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावं लागेल, असेही आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा मानेचा त्रास जाणवू लागला आहे. स्पाईन सर्जन डॉक्टर मिहीर बापट यांना मातोश्रीवर बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल बुधवारी वर्षा बंगल्यावरुन बाहेर निघाले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मानेचा त्रास जाणवू लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

SCROLL FOR NEXT