Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

मी कोणत्याही संकटाला भीत नाही, मी आव्हानाला सामोरं जाणारा आहे - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे राजकारण केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. गुवाहाटीत एका हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० समर्थक आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या (mva government) सर्व बड्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकाही सुरु आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढे काय होणार ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे तमाम शिवसैनिक यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही. कारण हिंदुत्व आमच्या श्वासात आहे, असा कानमंत्र बाळासाहेबांनी दिलेला आहे. २०१४ साली आपण लढलो तेव्हा आपण एकाकी लढलो. तेव्हा प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले ६३ आमदार निवडून आले. त्यानंतर जे आमदार मंत्री झाले ती शिवसेनाही बाळासाहेबांचीच आहे. हिंदुत्वाबाबत विधीमंडळात बोलणारा मी कदाचीत पहिला मुख्यमंत्री असेल. पण मी असं काय केलंय, की शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चालली आहे, असं तुम्हाला वाटतंय. काही आमदार सूरतला गेले, गुवाहटीला गेले. काहिंचे फोन येत आहेत. असं म्हणतानाच ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारं आहे.

यावेळी विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी मी हॉटेलात गेलो आणि बघितलं तर काय चाललं होतं. कुणी बाथरुमला गेला तरी शंका, लघुशंका ठीक आहे पण ही कुठली शंका, असं म्हणतं आमदारांना टोला लगावला. तसंच ते पुढे म्हणाले, मी इच्छेपेक्षा जबाबदारीने काम करणारा आहे. मी शिवसैनिकां दिलेलं वचन पूर्ण करणार. शरद पवार साहेबांनी सरकार स्थापन करताना बैठक घेतली तेव्हाच मुख्यमंत्रीबाबत ठरलं होतं.

त्यावेळी शरद पवार साहेब म्हणाले, उद्धव जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल,शिवसेनेकडून तुम्ही नसाल तर चालणं कठीण आहे. त्यानंतर मी जिद्द केली. पवार आणि सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास टाकला. असे म्हणतानाच त्यांनी आमदारांना भावनिक आवाहन केलं, एकाने जरी समोर येवून सांगितलं, तर मी राजीनामा देऊन वर्षावरुन मातोश्रीला येतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि राजभवनावर राजीनाम्याचं पत्र घेवून जावं,कारण मी जाऊ शकत नाही, मला कोविड आहे. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला, शरद पवारांनी केला. ते म्हणाले उद्धवजी मी तुमच्या सोबत आहे, असंही ते म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

SCROLL FOR NEXT