महाड दुर्घटनेमधील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत Saam tv
महाराष्ट्र

महाड दुर्घटनेमधील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी जाहीर केली आहे.

सुरज सावंत

आज सकाळपासून संपुर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत यामध्ये महाडमधील तळीये गाव तर कालच डोंगराखाली गेलं आहे आज तिथे रिस्क्यू टीमच काम चालू आहे अजून तेथील मृतांचा नक्की आकडा किती हे सुध्दा प्रशासनाला सांगता येत नाहीये अशातच आता उर्वरीत महाराष्ट्रात पण अशा दुर्घटना घडायला सुरुवात झाली आहे यामध्ये सातारा, पाटण या भागामध्ये पण दरड कोसळून लोकांचे प्राण गेले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. CM provides Rs 5 lakh to heirs of deceased in Mahad tragedy

तसेच जे लोक या दुर्घटनेमध्ये जखमीं झाले आहेत त्यांच्यावरती शासकीय खर्चाने(At government expense) उपचारही करण्यात येणार असल्याचही मुख्यमंत्र्यांनी CM घोषीत केलं आहे. दुर्घटनेमुळे मृत आणि जखमी झालेल्या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी प्रकट केल्या आहेत.

रायगडRaigad जिल्ह्यात तळीये(Taliye) मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा, पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे इत्यादी ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झालेल्या. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत मुख्यमत्र्यांकडून घोषीत करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल असही मुख्यमंत्र्यानी घोषीक केलं आहे.

पावसाच थैमान असेच राहणार

अजून काही तास पावसाच्या अतिवृष्टीचा ईशारा मुंबईच्या वेधंनशाळेनेBy Mumbai Observatory दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पंतप्रधानांनी जाहीर केली मदत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Pm narendra modi सुध्दा महाडमधील मृतांच्या कुटुंबीयांसाठई 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना पन्नास हजाराची मदत जाहीर केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT