CM Eknath Shinde native Village Visit:  Saamtv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: 'परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा', दरे गावचा व्हिडिओ शेअर करत CM शिंदेंचा ठाकरेंना टोला?

CM Eknath Shinde native Village Visit: इलेक्शनचा धुरळा, प्रचार सभांचा धडाका, आरोप- प्रत्यारोप, टीका- टीप्पण्यांच्या फैरींनी गेले दोन महिने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. लोकसभेचा हा रणसंग्राम शांत झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत.

Gangappa Pujari

सातारा, ता. ३० मे २०२४

दोन महिन्यांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी, दौरे, सभांचा धडाका अन् आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींनंतर नेते मंडळी आता निकालाची वाट पाहत आहेत. एकीकडे लोकसभेत प्रचाराचा धुरळा उडवल्यानंतर उद्धव ठाकरे हे परदेशात गेले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेतीत रमल्याचे पाहायला मिळाले. या गाव भेटीचा सुंदर व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदे यांनी शेअर केला असून 'परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा' असे म्हणत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यात मुक्काम!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. तीन दिवस ते साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी मुक्काम करणार आहेत. या गावभेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गावातील शेतीची पाहणी केली. या गावभेटीचा सुंदर व्हिडिओ त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेतातील आंबा, फणसाच्या फळबागा, भाज्यांचे मळे तसेच पशुपालनाची पाहणी करत त्याची माहिती घेताना दिसत आहेत. "परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी,वसे जिथे विठूरायाची पंढरी," असा सुंदर कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिला आहे.

"लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

Brinjal Dishes : वांग्याच्या ५ सोप्या अन् चविष्ट रेसिपी, आताच नोट करा साहित्य-कृती

SCROLL FOR NEXT