Prithviraj Chavan, CM Eknath Shinde, supreme court , maharashtra political crisis
Prithviraj Chavan, CM Eknath Shinde, supreme court , maharashtra political crisis saam tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्या; Prithviraj Chavan म्हणाले, मुळातच सरकार बेकायदेशीर पद्धतीने अस्तित्वात आलेलं

Siddharth Latkar

Prithviraj Chavan On Supreme Court Final Decision on Shivsena Case : सर्वोच्च न्यायालयाने नाेंदवलेली तीन महत्वाची निरीक्षणं पाहता महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशिर पद्धतीने असतित्वात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी राजीनामा द्यावा आणि नवीन सरकार आणावं असे मत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकाल वाचताना सर्वोच्च न्यायालयानं काही महत्वाची निरीक्षणं (Supreme Court Final Decision on Shivsena Case) नोंदवली. ही निरीक्षणं उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असल्याचे दिसून आले. परंतु मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी दिला नसता तर सरकार परत आणलं असतं, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणती याचा निर्णय देताना फक्त संसदीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यातल्याच बहुमताचा विचार केला. संघटनेतील बहुमताचा विचार केला नाही. ही मोठी चूक आहे म्हणून सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. अध्यक्षांच्या वर्तवणूकीवर देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत. परंतु निलंबनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला नाही, कारण याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे.

त्यामुळेच ही बाब विधानसभा अध्यक्षांकडे गेली आहे. एका कालबध्दपद्धतीने याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशे निर्देश न्यायालयाने दिलेत. परंत निलंबनाचा निर्णय न्यायालयाने घेतला नाही त्यामुळे हे सरकार जीवंत आहे असे म्हणावे लागेल.

चव्हाण म्हणाले ज्या आर्थी तीन संविधानीक पदांवर असलेल्या संस्था किंवा व्यक्तींनी - राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधीमंडळ अध्यक्ष- यांनी घेतलेल्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे पाहाता, मुळातच हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने अस्तित्वात आलेलं आहे हे सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालातून दिसतं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

SCROLL FOR NEXT