संजय महाजन
Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा आहे. सत्ताधाऱ्यांनी जमीनीवर राहायचं असतं, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. शरद पवार यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे सेवक' असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे बडगुजर समाजाचा राज्यस्तरीय मेळाव्यास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'शरद पवार हे मोठे नेते आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे सेवक आहोत. आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ते म्हणून काम करत आहे. उद्याही कार्यकर्ते म्हणून काम करू'.
दरम्यान, बडगुजर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, 'बडगुजर समाजाचं महाअधिवेशन होतं. त्याला शुभेच्छा दिल्या. त्यांचे काही प्रश्न आहेत. ते ओबीसीमध्ये आहेत. केंद्रातही त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे'.
'आम्ही सकारात्मक भूमिकेतून केंद्र सरकारला विनंती करू. राज्यातही त्यांना सुविधा मिळत आहेत. तसेच त्यांच्या हॉस्टेलविषयी विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. ते सकारात्मक दृष्टीने न्याय देण्याचं काम सरकार करेल', असेही एकनाथ शिंदे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.