CM Eknath Shinde  Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : जे बोलतो ते करतो, मराठ्यांना आरक्षण देणारच - एकनाथ शिंदे

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी मराठा समजाला आरक्षण देणार असल्याचा शब्द दिलाय. यावर मनोज जरांगे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde Maratha Aarakshan : आम्ही जे बोलते ते करतो. मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईमध्ये आज महायुतीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीच्या कामाचे रिपोर्ट कार्ड जारी केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केले. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनाही प्रश्न विचारला.

मनोज जरांगेंनी विचार करावा -

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आम्ही शब्द दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं. 10 टक्के आरक्षण आम्ही दिलं, ते रद्द करण्यासाठी कोण कोर्टात गेलं? मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं. आता ते मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आहेत.पण त्यांनी हा देखील विचार करावा, की आम्ही काय दिलं. आम्ही सारथी दिलं,महामंडळ दिलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, तर फक्त एकनाथ शिंदेंच देऊ शकतात. तो धाडसी माणूस आहे. एकनाथ शिंदे बोलत नाही, बोलला तर पूर्ण करतो. एकनाथ शिंदे कुणालाही अंगावर घेणार, पण आरक्षण देणार. आजही मराठा समाजात एकनाथ शिंदेंच्या शब्दाला किंमत आहे. तुम्हाला कोण काम करु देत नाही, हे माहित नाही. पण या लफड्यात माझ्या मराठ्यांचा वाटोळं झालं.
मनोज जरांगे पाटील

तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार

लोकसभेला लोकांना त्यांनी फसवलं पण या वेळेला लोकं फसणार नाहीत. 60-70 कॅबिनेट झाल्या त्यात 900 निर्णय घेतले. ते म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार, जेलमध्ये टाकणार...अरे कोणाला टाकणार जेलमध्ये. लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार, असे एकनाथ शिंद म्हणाले.

आम्ही घाबरत नाही -

रिपोर्ट कार्ड देणारं आमचं पहिलं सरकार आहे. कारण आम्ही काम केलं. सकाळी सकाळी काय दाखवता ते....त्याऐवजी कोस्टल रोड दाखवा, अटल सेतू दाखवा. तुमचा टीआरपी वाढेल. सकाळच्या भोंग्याला लोकं कंटाळले आहेत. आमच्यावर कोणी काहीही आरोप करु देत. आम्ही घाबरत नाही, असेही एकनाथ शिंद म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT