vasai landslide news
vasai landslide news  saam tv
महाराष्ट्र

वसई दरड दुर्घटनेत दोघांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचे निर्देश

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

वसई : वसई राजवलीच्या वाघरळपाडा या परिसरात दरड कोसळली. वसई पूर्वेच्या वाघरळपाडा येथील एका चाळीतील घरावर दरड कोसळली होती. या दुर्घटनेत सहा जण अडकले होते. वसई विरार अग्निशमन दलाने बचाव कार्य करत ४ जणांना सुखरूप बाहेर बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पालघर जिल्हाधिकारी आणि वसई-विरार महानगरपालिकेला दिले आहेत. ( Eknath Shinde News In Marathi )

वसई (Vasai) पूर्वेच्या वाघरळपाडा येथील एका चाळीतील घरावर सकाळी दरड कोसळली. यात दुर्घटनेत सहा जण ढिगार्‍याखाली अडकले होते. त्यातील ढिगार्‍यातून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.तर या दुर्घटनेत अमित सिंह (४५) व त्यांची मुलगी रोशनी सिंग (१६) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृत अमित सिंह यांचा मृतदेह सकाळी साडे दहा वाजता बाहेर काढण्यात आला. तर त्यांच्या मुलीचा मृतदेह एक वाजता काढण्यात आला. त्यानंतर पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाल यांच्या आदेशानंतर बचाव कार्य थांबविण्यात आलं.

दरम्यान, वसईच्या राजवली वाघरळपाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी आणि वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी २ लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी ६ लाख मदत करण्यात येणार आहे. याशिवाय जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT