Jalna : विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकारी रंगेहाथ पकडला

प्रदीप महादेव जाधव असे या लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
Jalna Jafrabad Crime
Jalna Jafrabad CrimeSaam Tv
Published On

जालना : कृषि स्वावलंबन योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीचे बिल काढण्यासाठी शेतकऱ्याकडून (Farmer) सहा हजारांची लाच स्वीकारताना कृषी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आलं. आज (बुधवार 13 जुलै) जाफराबाद (Jafrabad) येथे सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. प्रदीप महादेव जाधव असे या लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी 10 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. (Jalna Crime News)

Jalna Jafrabad Crime
Pune Rain : पुण्यासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे; घराबाहेर न पडण्याचा सल्ला, शाळा-कॉलेजला सुट्टी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार शेतकऱ्याची जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण गावातील गट क्रमांक ७५ मध्ये शेती आहे. शेतात विहीर नसल्याने शेतकऱ्यांने विहिरीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत तक्रारदार यांच्या बहिणीच्या नावे 2 लाख 50 हजार अनुदानित विहिर मंजूर करण्यात आली होती. या विहिरीचे खोदकाम पूर्ण हुन बांधकाम झाल्याने दोन लाखाचे बिल उचण्यात आले होते.

सदरील विहिरीचे कठडे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून 50 हजाराचे बिल मिळणे बाकी होते. दरम्यान, हे बिल मिळावे म्हणून तक्रादार शेतकऱ्याने कृषी अधिकारी प्रदीप जाधव यांना विनंती केली. उर्वरीत बिल काढायचे असल्यास 10 हजार रुपये द्यावे लागेल. अशी मागणी कृषी अधिकारी जाधव यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे केली. (Jalna Marathi News)

Jalna Jafrabad Crime
धक्कादायक! एका महिलेसह २४ कैद्यांना HIV ने गाठलं; कारागृह प्रशासन हादरलं

दरम्यान, तक्रारदार शेतकऱ्याची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणाची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचत कृषीअधिकारी जाधव यांना तडजोडीअंती 6 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जाफराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कृषी अधिकारी प्रदीप जाधव यांना अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com