CM Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

'शिंदे-फडणवीस' सरकारचं उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीत काय होणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

'शिंदे-फडणवीस' सरकारमध्ये उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक पार पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'शिंदे-फडणवीस' सरकार (Maharashtra Government) उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या परीक्षेतही (floor test) पास होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याने मविआ नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये राज्य सरकारमधील सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. आज पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्येही आपलं सरकार नक्की यशस्वी ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उद्याची रणनीती आखण्यासाठी बैठक झाली. योवेळी बहुमत चाचणीला सामोरं जाण्यासाठी आमदारांसोबत मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनी चर्चा केली.

यावेळी आमदारांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, आज पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्येही आपलं सरकार नक्की यशस्वी ठरेल. दरम्यान, या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले,आमदार दीपक केसरकर,आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना-भाजप युतीचे तसेच सहयोगी पक्षांचे आमदार उपस्थित होते.

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी राजकीय मैदानात उतरले होते. विधानसभा सदस्यांची मतदान प्रकिया पार पडल्यानंतर भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय झाला. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका-टीप्पणी केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT