'आमचा प्राणवायू काढून घेऊ नका', शिवसेना खासदाराची 'शिंदे-फडणवीस' सरकारला कळकळीची विनंती

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnvis, Eknath Shinde
Devendra Fadnvis, Eknath ShindeSaam Tv
Published On

मुंबई : मेट्रो कारशेडची आरेच्या जंगलात उभारणी करण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. अशातच आता बहुचर्चीत असलेल्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. पंरतु, शिवसेनेकडून या प्रकल्पाला जोरदार विरोध केला जात आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई ते दिल्ली,कन्याकुमारी ते दिल्ली अशी बुलेट ट्रेन हवी आहे. मुंबईच्या लोकांसाठी आरेचं जंगल म्हणजे फुफ्फुस आहे. आमचा प्राणवायू काढून घेऊ नका, अशी कळकळीची विनंती सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केली आहे.

Devendra Fadnvis, Eknath Shinde
'तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर', विराट कोहली जॉनी बेयरस्टोशी भिडला

माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, बुलेट ट्रेन किंवा मेट्रोचा विषय घेवून तुम्ही तुमचा राग मुंबईच्या जनतेवर काढू नका. मुंबईच्या लोकांसाठी आरेचं जंगल म्हणजे फुफ्फुस आहे. आमचा प्राणवायू काढून घेऊ नका, एवढीच आमची विनंती आहे. मुंबई ते दिल्ली,कन्याकुमारी ते दिल्ली अशी बुलेट ट्रेन हवी आहे. दोन तासांच्या प्रवासाला बुलेट ट्रेन लागते का ? बुलेट ट्रेनबाबत त्यांचा इगोइस्टिक विषय असेल. मुंबईच्या जनतेला उत्तम लोकल सेवा हवीय,उत्तम वाहतूक सेवा हवीय.त्यामुळे गोरगरिबांना जी सेवा हवीय,त्या गोष्टीला प्राधान्य देणं आवश्यक आहे. मुंबईच्या लोकांना बुलेट ट्रेन हवी की नको,लोकांनीं अजून जमिनी दिलेल्या नाहीत, असंही सावंत म्हणाले.

Devendra Fadnvis, Eknath Shinde
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात

राज्यात 'शिंदे-फडणवीस' नवनिर्वाचीत सरकारने बहुचर्चीत असलेल्या मुंबई-अहमदाबादचा बुलेट ट्रेन प्रकल्प गांभिर्याने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली नव्हती. परंतु आता शिंदे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) महत्वाकांक्षी प्रकल्प गतिमान करण्यासाठी पावले उचलल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सुमारे १५० हेक्टर क्षेत्राचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे. अद्याप या कामाने वेग घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती. त्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्प रखडल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

मात्र, राज्यात आता भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनमधील खर्चाचा राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही शिंदे सरकार करणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेनला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने बुलेट ट्रेनचे काम मंदावले होते. मात्र, आता मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेनच्याही कामाला गती येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com