CM Eknath SHinde Saam TV
महाराष्ट्र

CM Eknath Shinde on Barsu Refinery Protest: आंदोलकांवर लाठिचार्ज झालेला नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मी स्वत: उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोललो आहे.

साम टिव्ही ब्युरो

Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरी विरोधात सुरु असलेलं स्थानिकांचं आंदोलन पाचव्या दिवशी चिघळलं आहे. आंदोलनकर्त्या नागरिकांवर पोलिसांनी लाठिचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. मात्र याठिकाणी कुठलाही लाठिचार्ज झाला नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मी स्वत: उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोललो आहे. तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. आता तिथे शांतता आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही, अशी माहिती मला देण्यात आली.

आंदोलनस्थळी काही लोक स्थानिक होते, मात्र बरेच लोक बाहेरचे होते, अशी माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करुन जबरदस्ती करुन हा प्रकल्प लादला जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  (Breaking Marathi News)

बारसू रिफायनरी प्रकल्प तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणारा आहे. म्हणून जवळपास 70 टक्के लोकांचं प्रकल्पाला समर्थन आहे. मात्र ज्यांचा विरोध आहेत त्यांना सरकारच्यावतीने प्रकल्पाची माहिती, फायदे, महत्व समजवून सांगितलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

स्थानिकांनी शांतता राखावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. विरोधी पक्षाला राजकारणाशिवाय काहीही सूचत नाही. अडीच वर्ष राज्याचा कारभार ठप्प होता. राज्यातील ठप्प प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत याचं दु:ख त्यांना आहे, अशी टीकाही मुख्यमत्र्यांनी विरोधकांवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT