Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde: 'विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर टीकास्त्र

Eknath Shinde: खरी शिवसेना आपल्याकडे आहे, खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोकणी माणूस शिवसेनेला साथ देईल..." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी|ता. ८ जानेवारी २०२४

CM Eknath Shinde Speech:

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आज शिवसेनेच्या वतीने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात होत आहे. "मिशन 48, शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचं." ही टॅगलाईन घेऊन या संकल्प अभियानाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रत्नागिरी दौऱ्यावर आलेत. या कार्यक्रमावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूकांची रणनिती स्पष्ट केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"मुंबई ठाण्यासह सिंधुदुर्ग रत्नागिरी हे शिवसेनेचे (Shivena) दोन फुफुस आहेत. उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी मला खंबीर साथ दिली त्यांनी मंत्रीपद सोडले. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे, खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोकणी माणूस शिवसेनेला साथ देईल..." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

सत्तेपेक्षा विचार मोठे...

तसेच "विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी तत्वांची लढाई केलेली आहे. सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत. बाळासाहेबांची संपत्ती नको मला त्यांची विचार हवे आहेत.." असेही शिंदे (Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

बाळासाहेबांचे स्वप्न साकार...

"बाळासाहेबांना एक दिवसाचा पंतप्रधान व्हायचं होतं. त्या एका दिवसामध्ये राम मंदिराचा निर्णय आणि कश्मीरमधील 370 कलम काढून टाकायचं होतं. त्यांचे हे स्वप्न आता हे सरकार पूर्ण करत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी मोदीजींना शाबासकी दिली असती. पण आज काय ते टीका करतात राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत आहेत.." असा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधात उतरणाऱ्यांची सफाई..

"हा मुख्यमंत्री काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. मुंबई स्वच्छता अभियान सुरू केलं लोकांच्या पोटात दुखू लागलं फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र स्वच्छता राबवणार. जे कोणी विकासाच्या विरोधात उतरतील त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईल.." अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT