Ram Mandir Inauguration: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार; श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आलं

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण आले. या सोहळ्याला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSaamtv
Published On

Ram Mandir Inauguration:

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आज या सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण आले. तसेच या सोहळ्याला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही 18 ते 22 जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन तमाम शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ayodhya Ram Mandir
Nandurbar Corona Update: नंदुरबारमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; उपचारासाठी पाठविले सुरत 

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे अशी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न होते. स्वर्गीय आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. (Latest Marathi News)

Ayodhya Ram Mandir
Shivsena News : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे कायम राहणार की नाही? 2 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com