Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Eknath shinde speech: मी हेलिकॉप्टरमध्ये जाऊन शेती करतो, पण हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढत नाही; CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath shinde speech in Hingoli: 'मी हेलीकॉप्टरमध्ये जाऊन शेती करतो, पण हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Vishal Gangurde

Eknath Shinde News:

आज बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून या प्रकरणाच्या निकालाचं वाचन होईल. या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या ऐतिहासिक निकालाआधीच मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'मी हेलीकॉप्टरमध्ये जाऊन शेती करतो, पण हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे हे आज बुधवारी हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या सभेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली.

'बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पू्र्ण करण्यासाठी निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून विकास करत आहोत. ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात राज्यात काहीच विकास झाला नाही. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे माझे काम आहे. उंटावरून बसून शेळी हाकत नाही तर लोकांचे काम करतो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मी हेलिकॉप्टरमध्ये जाऊन शेतकी करतो म्हणून माझ्यावर टीका करतात. पण मी हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढत नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली.

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधीच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रया

'आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मेरीटवर आला पाहिजे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे अधिकृत पक्ष सुद्धा आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे अध्यक्षांकडून अपेक्षा आहे की, मेरिटप्रमाणे त्यांनी हा निकाल द्यावा ही आम्हाला अपेक्षा आहे'.

दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, 'कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कामच नाही, काही झालं तरी सकाळी-दुपारी-संध्याकाळी कोर्टात...कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर चांगलं आणि कोर्टाने जर निकाल मेरिटवर दिला तर कोर्ट वाईट... इलेक्शन कमिशनने जर त्यांच्या बाजूने निकाल दिला तर चांगलं नाहीतर वाईट... निवडणूक आयोगाला चुना आयोग असं म्हटलं जातं यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT