eknath shinde and uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : सोयरीक एकाशी आणि संसार दुसऱ्याशी थाटला; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोमणा

सूरज सावंत

Ekanth Shinde News : नागुपरात उद्यापासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. '२०१९ साली जे सरकार स्थापन झालं, ते पूर्णपणे अनैतिक होतं. त्यावेळी सोयरीक एकाशी केली आणि संसार दुसऱ्याशी थाटला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'नागपूरमध्ये मी पूर्वी कार्यकर्ता, आमदार मग मंत्री आणि आता मुख्यमंत्री म्हणून येत आहे. विदर्भ-नागपूर यांच्याशी जवळचे संबंध आहे. कारण मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो. हे अधिवेशन किती दिवस चालवावं, त्याला फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे'.

'अजित दादांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत. मी सांगू इच्छितो अजित दादा, हे सरकार लोकांच्या जनहिताचा आदर करून हाऊसमध्ये बहुमताने स्थापन झालं. २०१९ साली जे सरकार स्थापन झालं, ते पूर्ण अनैतिक होतं. सोयरीक एकाशी आणि संसार दुसऱ्याशी थाटला. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

'अजित दादांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. खोक्याची भाषा ते करत आहेत. खोक्यांवर खोके लावले तर, ते मोठं शिखर गाठतील. आम्हाला राज्याचा काही लवासा करायचा नाही. आम्ही ७० टक्के कामांवरच स्थगिती उठविली आहे. सूड बुद्धीने आम्ही काम करत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

'सीमावाद नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा तो मुद्दा आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसहित आम्हाला बोलावलं. या प्रकरणाची गंभीर दखल त्यांनी घेतली आहे. मात्र, सीमाभागातील लोकांच्या बंद पडलेल्या योजना आम्ही पुन्हा सरू केल्या, असे ते सीमावादावर म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 'आतापर्यंत जेवढा निधी अतिवृष्टी व अवकाळ पावसासाठी मंजूर झाला. तेवढा आम्ही दिला. एनडीआरएफची मदत वाढवली. शेतकर्यांना तातडीने विमाची रक्कम खात्यात जमा केली. अजित पवार यांचा एक व्हिडिओ आहे. शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर त्यांनी काय देण्याची भाषा केली. मी बोलू इच्छित नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT