Chief Minister Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO : पोटदुखी ,उलट्या झाल्या त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाना आहे; CM शिंदेंची तुफान टोलेबाजी

eknath shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडला भेट दिली. यानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी विविध विषयावर भाष्य केलं. तसेच यावेळी विरोधकांनी टोलाही लगावला.

Vishal Gangurde

मुंबई : आषाढी एकादशी जवळ आली आहे. यानिमित्ताने हजारो वारकरी विठुरायच्या दर्शनासाठी पंढरीकडे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारही सज्ज झालं आहे. राज्य सरकारने प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय दिला आहे. वारकऱ्यांसाठी ट्रोल फ्री केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. सगळं केलं आहे. समोरच्यांना पोटदुखी झाली. उलट्या झाला, तर त्यांना बाळासाहेब दवाखाना आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुख्यमंत्री शिंदे रायगड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'महाराष्ट्र राज्य शिव छत्रपती यांच्या आदेशावरून चालणारे आहे. त्यांच्याच आशीर्वादाने राज्य पुढे जात आहे. तसेच सरकार काम करते. स्वराज्य शब्दामुळे मराठ्यांना ताकद आली. लोकमान्य टिळकांनी पण हाच शब्द वापरला. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू नये, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता. आम्ही देव, देश,धर्म आणि रक्षण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आहे. सुधीरभाऊ वाघ नखे आणणार आहेत. मोदीजी पण मदत करत आहे'.

'मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नही बतायेंगे, म्हणणऱ्यांची थोबाड बंद करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केलं. युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये सात समुद्रा पार आपल्या १८ किल्यांचा इतिहास गेला आहे. तिथीनुसार शिव राज्याभिषेक सोहळा ही मागणी मान्य करतोय. पण तारखेनुसार ६ जूनला केला. हे सरकार तुमचं आहे. सर्वसामान्यांचे आहे. सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहे, असे शिंदे पुढे म्हणाले.

'गड किल्यांचं रक्षणाचे काम सरकार करेल. तुमचं निवेदन स्वीकारलं आहे. मी कमी बोलतो आणि काम अधिक करतो. तुमच्या मनात जे आहे, तेच माझे पण स्वप्न आहे. पण योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम करणार आहे. खुर्च्या येतील आणि जातील, पण आम्ही खुर्च्यांसाठी लाचार होणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

SCROLL FOR NEXT